ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत, लसीच्या एकूण 36 कोटींहून अधिक मात्रा देऊन भारताने महत्वाचा टप्पा ओलांडला आहे. सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 36 कोटी 85 लाख 76 हजार 352 मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात लसीच्या 36,08,940 मात्रा देण्यात आल्या. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरुवात झाली.
- दरदिवशी एक कोटींचे लक्ष्य
देशात तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. अशात सर्वांच्या व्हॅक्सिनेशनसाठी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी आहे. येणाऱ्या दिवसात प्रत्येक दिवशी 1 कोटी डोस देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे









