समीर कटके/यमगे (वार्ताहर)
कोरोना विषाणूचा धोका अद्याप टळलेला नाही. लसीकरणाची जोरदार तयारी सुरू आहे. यातच इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांमुळे कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नव्या कोरोनामुळे भितीचे वातावरण असतानाच आणखी एका विषाणू आजारामुळे दहशत वाढली आहे. देशात ‘बर्ड फ्लू’चे रुग्ण वाढत आहेत.
राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये ‘बर्ड फ्लू’चा धोका वाढत आहे. यामुळे या राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. पक्षी आणि मानव यांच्यासाठी धोकादायक व्हायरस आहे. ‘बर्ड फ्लू’ हा आजार ‘एवियन इन्फ्लूएंजा वायरस’ (H5N1) या विषाणूमुळे होतो. ‘बर्ड फ्लू’ संक्रमित पक्षी किंवा प्राण्यांच्या संपर्कात आल्यास मानवालाही याची लागण होऊ शकते. यामुळे मृत्यूही ओढावू शकतो. हा आजार कोंबड्या, टर्की, मोर आणि बदक यासारख्या प्राण्यांमध्ये वेगाने पसरतो. हा आजार धोकादायक असून यामुळे प्राण्यांसह मानवाचाही मृत्यू होऊ शकतो.
‘बर्ड ब्लू’मुळे राजस्थानातील जवळपास २५० तर मध्य प्रदेशात ५० कावळ्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे.मृत कावळ्यांत H5N8 विषाणू प्रादुर्भाव दिसून आला आहे. केरळमध्येही १२००० बदकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर संबंधित राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानंतर, झारखंड आणि हिमाचल प्रदेशातही या विषाणूसंबंधी अलर्ट जारी करण्यात आलाय. केंद्र सरकारनंही या घटनेची नोंद घेतलीय.
बर्ड फ्ल्यू लक्षणे
‘बर्ड फ्लू’ची लागण झाल्यास ताप, छातीत कफ होणे, नाक वाहणे, डोकेदुखी, घशात सूज येणे, स्नायुंना वेदना होणे, श्वसनास त्रास होणे, सतत उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे दिसतात.
पोल्ट्री उद्योग पुन्हा अडचणीत येण्याची भीती
कोरोनाव्हायरस कोंबड्यांपासून होतो अशी अफवा असल्यामुळे महाराष्ट्र राज्य देशातील अनेक राज्यांमध्ये चिकन आणि अंडी व्यवसाय बंद पडले. मातीमोल भावाने चिकन आणि अंडी यांची विक्री झाली. पोल्ट्री व्यावसायिक कर्जबाजारी झाले. यापूर्वी भारतात बर्ड फ्ल्यू साथीची घटना घडल्या आहेत. त्यावेळी सुद्धा पोल्ट्री व्यावसायिक यांना नुकसान सोसावे लागले होते. सध्या भारतात बर्ड फ्लू मुळे कावळे, कोंबड्या, बदके व अन्य पक्षी मृत्यूमुखी पडत असल्यामुळे त्याचा परिणाम भारतातील प्रमुख अन्नघटक असणाऱ्या पोल्ट्री क्षेत्रावर होणार अशी भीती व्यक्त होत आहे.
Previous Articleस्टॅलिन विरोधात अलागिरी यांचा शड्डू
Next Article चिनी हेरांची अफगाणकडून सुटका









