नवी दिल्ली
भारतीय बाजारामध्ये स्मार्टफोन विक्री करणाऱया विविध कंपन्यांमध्ये चिनी कंपन्यांचा दबदबा अधिक राहिला असल्याची माहिती मार्केट मॉनिटर सर्व्हिसच्या अहवालामधून दिली आहे. प्राप्त अहवालानुसार शाओमी कंपनीने 2021 च्या पहिल्या तिमाहीत 26 टक्क्यांच्या बाजारातील हिस्सेदारीसह प्रथमस्थानी राहिली आहे. तसेच वर्षाच्या आधारे 23 टक्क्यांची वाढ नोंदवल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्राप्त माहितीनुसार कोरियन कंपनी सॅमसंग बाजारातील हिस्सेदारीत लिस्टमध्ये दुसऱया स्थानी राहिली आहे. चीनची विवो कंपनी 16 टक्के बाजारातील हिस्सेदारीसोबत तिसऱया आणि रियलमी ही 11 टक्क्यांच्या वाढीसोबत चौथ्या स्थानी राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.









