पुलाची शिरोली / वार्ताहर
देशातील वाढत्या महिलांच्या बलात्कार घटना विरोधात भाकपणे शिरोली ग्रामपंचायत चौकात गांधी जयंती दिनी आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. गिरीश फोंडे यांनी केले.
उत्तर प्रदेशमध्ये एका तिच्या वरती बलात्कार करून तिला मरेपर्यंत जखमी करण्यात आले. भाजपच्या योगी सरकारने तिच्यावर वेळेत योग्य उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाला. संशयास्पद रित्या सरकारने पोलिसांच्याद्वारे तिचा मृतदेह घरच्यांच्याकडे न देता स्वतः जाळला व विरोधी पक्षांना मुस्कटदाबी सुरू केली. ही घटना संपते तोवर उत्तर प्रदेशमध्ये इतर जिल्ह्यात देखील महिलांची दररोज बलात्कार व खून अशी प्रकरणे घडत आहेत. या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनी देशभर आंदोलन करण्याचे नियोजन होते. याचाच एक भाग म्हणून पुलाची शिरोली येथे कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी गांधी जी के देश मे महिलाओ पे अत्याचार नही चलेगा, रेप थांबवा देश वाचवा, योगी सरकार राजीनामा द्या, नारीशक्ती जिंदाबाद, दलित महिलांच्या वरील अत्याचार थांबलेच पाहिजेत अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना गिरीश फोंडे म्हणाले,” सन २०१९ मध्ये देशात एकूण ३७०० दलित महिलांवर बलात्कार झाले. दररोज १० दलित महिलांवर बलात्कार झाले. भाजपशासित उत्तर प्रदेश राज्य यामध्ये आघाडीवर आहे. मनुस्मृति आधारित राज्याच्या प्रस्थापनेसाठी महिलांना नियंत्रित करण्यासाठी संघ प्रणित सरकार हे सावरकर यांच्या म्हणण्यानुसार बलात्कार हे हत्यार म्हणून वापरत आहे.”
यावेळी सुनंदा शिंदे, जयश्री नाईक, मासाई पखाले, राजेंद्र पाटील, राजू देसाई, मीनाताई कावळे,जमीर गडकरी, रुपेश फोंडे,रेणुका आंबी, निखिल चव्हाण, अनुसया पवार, अरुण शेंडगे, पार्वती लोहार, हौसाबाई गोसावी, बेबी कावळे यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Articleसांगलीत 497 नवे रुग्ण तर 685 जण कोरोनामुक्त
Next Article बेळगाव जिह्यात शुक्रवारी 304 जणांना कोरोनाची बाधा









