ऑनलाइन टीम / पुणे :
योग, आयुर्वेद, संगीत, अध्यात्म आणि भारतीय कुटुंब व्यवस्था या पाच गोष्टी भारताने जगाला दिल्या. या पाच गोष्टींमुळे जगाला सुख शांती मिळू शकते. स्वामीजींची देशावर विलक्षण श्रद्धा होती. इंग्रज भारतात आले आणि त्यांनी भारतातील विविध संघटना एकत्र केले त्यामुळे भारत अखंड भारत बनला असे काही लोक म्हणतात. परंतु ते सत्य नाही भारत देशात असणाºया लोकांच्या मनातील श्रद्धेमुळे देश अखंड आहे.असे मत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी व्यक्त केले.
डॉ. शरद कुंटे म्हणाले, संपूर्ण जगाला लक्षात राहील, अस काही तरी आपण केले पाहिजे ही स्वामी विवेकानंद यांची शिकवण आपण लक्षात ठेऊन तशी कृती करायला हवी.स्वामी विवेकानंद म्हणतात जगातून भारताला अनेक गोष्टी मिळाल्या असतील पण भारताकडून जगाला आपण काय देऊ शकतो याचा विचार करा, असेही त्यांनी सांगितले. सूर्यकांत पाठक यांनी प्रास्ताविक केले. सागर वाळके यांनी सूत्रसंचालन केले. प्राची सोमण यांनी आभार मानले.









