ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन काही काळ सुरू ठेवावा, अशी शिफारस इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेने केंद्र सरकारकडे केली आहे.
देशात कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागात एक तृतीयांश लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवती माता यांना या विषाणूचा धोका अधिक असून, पुढील काही महिने हा धोका राहील. त्यामुळे कोरोनाशी लढा देण्यासाठी अजून काही काळ देशात लॉकडाऊन सुरू ठेवावा, असे आयसीएमआरने म्हटले आहे.
भारतातील लोकांच्या कोरोनाशी मुकाबला करण्याच्या प्रतिकारशक्तीचा अभ्यास करण्यासाठी आयसीएमआरने 83 जिल्ह्यातील 26 हजार 400 लोकांचे सिरॉलॉजीकल सर्व्हेक्षण केले. त्यानंतर या संस्थेने केंद्राकडे ही शिफारस केली आहे.