सांगरूळ /वार्ताहर
महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्यावतीने व सिद्धेश्वर गायकवाड यांच्या सहकार्याने आयोजित भारतातील पहिल्या लाईव्ह कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत उपमहाराष्ट्र केसरी पै . संतोष दोरवड (ता .शाहुपरी )यांनी सेनादलाच्या पै.विष्णुपंत खोसे यांचेवर ५३ व्या मिनिटाला गुणांवर विजय मिळवला .
द्वितीय क्रमांकाच्या प्रेक्षणीय लढतीत पै .रवींद्र शेडगे यानी पै . विक्रम वडतीले यांचेवर डंकी डावावर मात केली. तृतीय क्रमांकाच्या लढतीत पै . शशिकांत बोंगार्डे यांनी पै आशिष वावरे याच्यावर विजय मिळविला. चार नंबरच्या कुस्तीत पै . अनिकेत गावडे यांनी पै .अक्षय कदम वर गुणांवर मात केली .या प्रमुख लढती बरोबरच अनेक लहान-मोठ्या चटकदार कुस्त्या झाल्या .
कोरोना विषाणूच्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे आण कुस्ती मैदानाच्या हंगामात मैदानेही रद्द झालीत .तालमी ही ओस पडल्या . तर नंतरच्या अनलॉकमध्येही सर्व खेळांच्या स्पर्धांना बंदी आहे. मात्र शारजाह, दुबईत प्रेक्षकाविना सुरू असणाऱया आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमी क्रिकेटचा लाईव्ह आनंद लुटत आहेत. हीच संकल्पना घेऊन कुस्ती मैदान घेण्याचा निर्णय कुस्ती-मल्लविद्या महासंघाने घेतला . प्रेक्षकाविना झालेल्या भारतातील पहिल्या कुस्ती मैदानातील चटकदार लढती कुस्तीरसिकांना यूटूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहायला मिळाल्या.
या कुस्ती मैदानात हलगी साथ हालगीवादक मारूती मोरे-गारगोटीकर यांनी दिली . ज्येष्ठ कुस्ती निवेदक पैलवान जोतिराम वाजे-सांगलीकर यांनी निवेदन केले .संयोजन कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे संस्थापक गणेश मानुगडे विक्रम कांबळेयांचेसह कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले .जवळजवळ 93000 कुस्ती शौकिनांनी यूट्यूब च्या माध्यमातून या मैदानास प्रतिसाद दिला .
मैदानात सहभागी आठही मल्लांची संपूर्ण आरोग्य तपासणी आणि कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्यांना आयसोलेटेडही करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सूचना, अटींचे पालन करण्यात आले होते.कुस्ती मल्लविद्या युटूब चॅनेलवर कुस्ती मैदानाचा कुस्ती शौकीनामी मनमुराद आनंद लुटला
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









