ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 5242 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 96 हजार 169 वर पोहचली असून, मृतांची संख्या 3029 एवढी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
सध्या देशात 56 हजार 316 ॲक्टिव कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 36 हजार 824 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 37.05 टक्के आहे.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील 3 दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग 13.6 दिवसांवर आला आहे. तर रुग्णांचा मृत्यूदर 3.1 टक्के एवढा आहे.









