आष्टा15 (वार्ताहर) आष्टा,
पाकिस्तान सरहद्दीवरती कायमच कुरघुड्या करीत असतो , आता चीन सुद्धा बोलतो एक व करतो एक अशा प्रकारे आपल्या देशाशी तो वागत आहे. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सरकार व देशाचे संरक्षण खाते सक्षम असून आपले सैनिक ही चीनला धडा शिकवण्यासाठी वाट पाहत आहेत. आज या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आपण शपथ घेऊया की, वेळ पडल्यास देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देण्यास आपणही तयार आहोत. असे प्रतिपादन जेष्ठ नेते.माजी मंत्री अण्णा डांगे यानी केले
संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील संकुलात 74 व्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते .
समारंभात आष्टा नगरीचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. सतीश बापट यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, अण्णासाहेब डांगे यांनी आष्टा येथे संस्थेचे संकुल निर्माण करून या शहरावर खूप मोठे उपकार केले आहेत. कारण एकेकाळी या मैदानावर टोळधाडीच्या नियंत्रणासाठी शासकीय विमाने औषध फवारण्यासाठी उतरायची, आज याच माळावर अण्णासाहेब डांगे यांनी एरोनॉटिकल इंजिनीअरिंग च्या माध्यमातून कायमस्वरूपी विमान उतरवून ठेवले आहे, कोरोना परिस्थितीवर मात करणेसाठी सोशल डिस्टंगशिंगचे पालन करून स्वातंत्र्य दिनाचा हा राष्ट्रीय उत्सव आपण साजरा करत आहोत याचा अभिमान आपण सर्वांनी बाळगला पाहिजे. संस्थेचे कार्यकारी संचालक प्रो. आर. ए. कनाई यांच्या हस्ते अण्णासाहेब डांगे यांचा सत्कार करण्यात आला. ंसंस्थेचे सचिव अँड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांनी डॉ. सतीश बापट यांचा तर मुंबईचे पोलीस निरीक्षक संजय पुजारी यांचा पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री सुभाष पाटील यांनी सत्कार केला यावेळी मेडिकल कॉलेजचे डॉ. सत्येन्द्र ओझा इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉ. विक्रम पाटील, व्यवस्थापक सुनिल शिणगारे यांच्यासह सर्व शाखांचे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके संयोजन संस्थेचे व्यवस्थापक सुनील शिनगारे, डॉ. एन. डी. सांगले, अशोक घोरपडे, रघुनाथ बोते, अजित पाटील, विजय पाटील, अधिक कुठे, अजित माने, आप्पासाहेब आळुळे, इत्यादींनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन . ए. के. पाटील यांनी केले. तर आभार संजय चव्हाण यांनी मानले.








