नवी दिल्ली
8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रेल्वे महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यांचा जल्लोष अनोख्या प्रकारे करणार आहे. उत्तर रेल्वेने 4 डिझेल इंजिन्सना देशाच्या इतिहासात स्वतःच्या शौर्याने नाव नोंदविणाऱया महिलांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आदरांजली अणि गौरवाचे प्रतीक म्हणून उत्तर रेल्वे तुघलकाबाद लोको शेडच्या इंजिन्सना महिला योद्धय़ांना समर्पित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुघलकाबादच्या लोकोमोटिव्ह शेडमध्ये राणी अहिल्याबाई, राणी अवंतीबाई, राणी वेलु नचियार, राणी चन्नम्मा, राणी लक्ष्मीबाई आणि झलकारीबाई यांच्यासह ऊदा देवी तसेच इतर कर्तबगार महिला लवकरच या ताफ्याचा हिस्सा होतील. 5 दशकांपासून सातत्याने उत्तम कामगिरी करणाऱया तुघलकाबाद लोको शेडला आमच्या इतिहासात स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूर महिलांच्या स्मृतीशी जोडण्यात आल्याचे उत्तर रेल्वेने म्हटले आहे.









