देशाची व्यापारी तूट वाढली
नवी दिल्ली
देशाचा व्यापारी तूट 2021-22 मध्ये 87.5 टक्क्यांनी वधारुन 192.41 अब्ज डॉलरवर राहिली आहे. या अगोदरच्या आर्थिक वर्षात हा आकडा 102.63 अब्ज डॉलर होता. सरकारी आकडेवारीनुसार मागील आर्थिक वर्षात निर्यात मात्र विक्रमी टप्प्यावर पोहोचत 417.81 अब्जवर राहिली तर आयातीमध्येही वाढ होत 610.41 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. यादरम्यान व्यापारी तूट 192.41 अब्ज डॉलरवर राहिली आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या माहितीनुसार भारताची वस्तू आयात 31 मार्च 2022 रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात 54.71 टक्क्यांनी वधारुन 610.22 अब्ज डॉलरवर राहिली आहे. या अगोदरच्या आर्थिक वर्षात 2020-21मध्ये हा आकडा 394.44 अब्ज डॉलर होता.









