पंढरपूर / प्रतिनिधी
देशाची परिस्थिती मृतावस्थेकडे जात आहे. त्यामुळे देशात लवकरच बेबंदशाही निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. हाथरससारखे अनेक प्रकरणे आहेत. अशा शब्दांत माजी केद्रिंय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी सत्ताधारी भाजपाचा समाचार घेतला. ते पंढरपूरात पत्रकारांशी बोलत होते.
सुशिलकुमार शिंदे हे पंढरपूरात माजी आमदार सुधाकरपंत परिचारक , वा. ना. उत्पात यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी नगरसेवक चेतन नरोटे , शहराध्यक्ष ऍड. राजेश भादुले , प्रकाश पाटील आदि उपस्थित होते.
सध्या सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध विस्कटलेल्या विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच मराठा समाजाला जे योग्य हवे आहे. ते मिळालेच पाहीजे. अशीही भूमिका त्यांनी याप्रसंगी विषद केली.









