सरकारच्या कृपेमुळे लोकं बेरोजगार झाल्याने घरीच
ऑनलाईन टीम / नवी मुंबई
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 27 सप्टेंबर 2020 रोजी तीन नव्या कृषी कायद्यांवर स्वाक्षरी करत कृषी विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले होते. याला देशातील सर्व शेतकऱ्यांसह जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला असताना ही केंद्र सरकारने तडजोडीची भुमिका न घेता. तिन्ही विधेयकांचे कायद्यात रुपांतर केले. याच पार्श्वभूमीवर केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) ‘भारत बंद’ पुकारला होता. या बंदला ही भाजप वगळता इतर पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. या कायद्याचा निषेध नोंदवण्यासाठी सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत रस्त्यांर आंदोलन केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत [sanjay raut ] यांनी प्रतिक्रिया दिली.
गेल्या दहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरु आहे. हे आंदोलन कोरोना काळात ही शेतकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता तसेच अखंडीतपणे सुरु ठेवले. तरी ही केंद्र शासन तडजोडीच्या भुमिकेत येण्यास तयार नसल्याने शेतकरी ही आपल्या मुद्यावर ठाम आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याच मुद्यांवरुन भाजपला टोले लगावले. आजच्या भारत बंदला लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे. आज लॉकडाऊन सुरु आहे. सरकारच्या कृपेमुळे उद्योगधंदे बंद पडले आहेत. लोकं बेरोजगार असल्याने घरीच आहेत. या देशाचा प्रत्येक नागरिक हा शेतकऱ्याबरोबर आहे,” असे ही राऊत यांनी म्हटले आहे.
हा बंद सकाळी ६ पासून दुपारी ४ वाजेपर्यंत पाळला जाणार असुन बंद दरम्यान देशभरातील सर्व सरकारी व खासगी कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहतील, तसेच सार्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत. रुग्णालये, औषधांची दुकाने यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.