मुंबई
येणाऱया सणानिमित्त अनेकांचा प्रवास करण्यावर भर असणार आहे. या प्रवासी वाहतुकीत अनेकजण विमान सेवा, रेल्वेसेवा व इतर सेवांचा वापर करतील. उत्सवी काळात देशांतर्गत प्रवासी वाहतूक 60 टक्के वाढेल असा अंदाज एका सर्वेक्षणात मांडण्यात आला आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला याचा जास्तीत जास्त लाभ होणार आहे. नवरात्र व दसऱयानिमित्त 46 टक्के जणांनी देशात इतर शहरात जाण्याचे नियोजन केले आहे.









