कायद्याच्या समर्थनार्थ भाजपा शेतकऱ्यांच्या बांधावर
प्रतिनिधी / मिरज
केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात सर्वपक्षीय आंदोलन सुरू असताना दुसरीकडे भाजपने शेतकरी कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलन केले. शहरातील बोलवाड रोडवरील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नवा कृषी कायदा हा शेतकरी हिताचा असल्याचा दावा करून या कायद्याचे महत्व शेतकऱ्यांना सांगण्यात आले. आमदार सुरेश खाडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. ‘पाकिटमार दलालांच्या देशव्यापी आंदोलनात सहभागी नाही’ असे पोस्टर घेऊन देशव्यापी आंदोलनाच्या विरोधात भाजपने घोषणाबाजी केली.
केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत भारत बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात मिरज शहर आणि ग्रामीण भागात विविध पक्ष आणि संघटनांकडून संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे.
नव्या कृषी कायद्याच्या विरोधात मंगळवारी दुपारी महाराणा प्रताप चौकात सर्वपक्षीय आंदोलन सूरु असताना भाजपने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलन केले. नवा कृषी कायदा हा शेतकरी हिताचा आहे. ‘मी शेतकरी : पाकिटमार दलालांच्या भारत बंद आंदोलनात सहभागी होणार नाही’ असे पोस्टर घेऊन कृषी कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलन केले.