ऑनलाईन टीम / तेहरान :
सन 2017 मध्ये ऑनलाईन मोहिमांच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेविरोधात देशव्यापी आंदोलन घडवून आणल्याप्रकरणी इराणचे पत्रकार रुहोल्ला झॉम यांना शनिवारी फाशी देण्यात आली.
झॉम याची वेबसाईट ‘आमदन्यूज’ आणि लोकप्रिय संदेशन अॅप टेलीग्रामवर त्याने तयार केलेल्या वाहिनीने इराणच्या शिया धर्मगुरूसत्ताक राज्यपद्धतीला थेट आव्हान देणारी माहिती प्रसारित केली होती. या पत्रकाराच्या लिखाणामुळे 2017 साली इराणमध्ये अर्थव्यवस्थेविरोधात झालेल्या आंदोलनाला पाठबळ मिळाले होते.
या पत्रकारावर हेरगिरी करून इराणचे सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा देखील आरोप आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. जूनमध्ये इस्लामच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती.









