संशयित दहशतवादी रत्नागिरीच्या आश्रयाला
प्रवीण जाधव / रत्नागिरी
दहशतवादी कृत्यामध्ये सहभाग असलेला संशयित रत्नागिरीच्या आश्रयाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आह़े यासंबंधी तपासासाठी दहशतवादविरोधी पथकातील 11 जण रत्नागिरीत आल़े या पथकाकडून संशयित दहशतवादी राहत असलेल्या ठिकाणाचा कसून तपास करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आह़े
रत्नागिरीत दहशतवादविरोधी पथक दाखल झाल्यानंतर रत्नागिरी पोलिसांमध्ये देखील चलबिचल निर्माण झाली होत़ी अतिशय गोपनीय दौरा असल्याने या पथकाडून कोणतीही कल्पना रत्नागिरी पोलिसांना देण्यात आली नव्हत़ी त्यामुळे हे पथक नेमके कशासाठी आले आहे, या बाबत विविध तर्कवितर्क लावले जात होत़े दरम्यान या पथकातील सदस्यांशी ‘तरूण भारत’ने संवाद साधला असता लवकरच या प्रकरणाची माहिती पत्रकार परिषद घेवून उघड करू, अशी देण्यात आल़ी
रत्नागिरीत दाखल झालेल्या या पथकाने नेमका काय तपास केला, त्यांना काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले का, कोणत्या दशहतवादी कृत्यामधील संशयित रत्नागिरीत वास्तव्यास होता, या बाबतचे गुढ वाढले आह़े जिह्यातील विविध ठिकाणी तपास करून हे पथक मुंबईला रवाना झाल्याचे समजते. कोकणची भूमी यापूर्वीदेखील देशविरोधी कृत्यांसाठी वापरली गेल्याचा इतिहास आजही ताजा आह़े 1993 साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील स्फोटके ही रायगड येथील बंदरामध्ये उतरवण्यात आली होत़ी त्यानंतर 720 किलोमीटर लांबीच्या कोकण किनारपट्टीवर सुरक्षा यंत्रणांकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आह़े
कोकणात रोजगाराच्या संधीचा वणवा असल्याने मोठय़ा प्रमाणावर स्थानिक रोजगाराच्या निमित्ताने मुंबई येथे वास्तव्यास आहेत़ तसेच गुन्हेगारी जगतातील कुख्यात गुंड याचे कोकण कनेक्शन उघड झाले आह़े त्याचाच फायदा देशविघातक कृत्य करण्यासाठी परकिय शक्ती करत आल्या आहेत़ याचा परिणाम म्हणून अतिशय शांतताप्रिय म्हणून ओळख असलेल्या कोकणाला गालबोट लागले आह़े यापुढेही कोकण किनारपट्टीचा वापर देशविघातक कृत्यासाठी होवू नये, यासाठी सुरक्षा यंत्रणाकडून सातत्याने या किनारपट्टीवर हाय अलर्टदेखील जारी करण्यात येत होत़ा
रत्नागिरी जिह्याला 167 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आह़े या किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी नौदल, तटरक्षक दल, सागरी सुरक्षा पोलीस आदी यंत्रणा काम करतात़ त्याचबरोबर स्थानिक मच्छीमार हे सुरक्षा व्यवस्थेला चांगल्या प्रकारे मदत करू शकत असल्याने त्यांनाही सुरक्षेच्या कामात सहभागी करून घेण्याचे धोरण अवलंबले जात आह़े मच्छीमारांच्या बोटी समुदकिनाऱयावर गस्त घालण्यासाठी वापरण्यावर पोलीस यंत्रणांकडून भर देण्यात आला आह़े
जिह्यातील सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले
26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर देशात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. रत्नागिरी जिह्यामध्ये अशा प्रकारे दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेला संशयित आश्रय घेत असल्याच्या वृत्ताने जिह्यातील सुरक्षा यंत्रणांचेही धाबे दणाणले आहेत.
तपास कामाबाबत माहिती उघड करता येणार नाही
दहशतवादीविरोधी पथक हे तपासकामासाठी रत्नागिरीत आले होत़े या पथकाचे काम हे अतिशय संवेदनशील विषयाशी निगडित असल्याने त्याची माहिती गोपनीय ठेवली जात़े त्यामुळे या पथकाच्या तपास कामाबाबत माहिती उघड करता येणार नाह़ी
-विशाल गायकवाड (अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक)








