मुंबई \ ऑनलाईन टीम
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारलाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. हा दोघांसाठीही मोठा झटका मानला जात आहे. सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी अनिल देशमुखांनी केली होती. तर देशमुख प्रकरणात दाखल गुन्ह्यातील दोन मुद्दे वगळण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने याचिका दाखल केली होती. पण या दोन्ही याचिका आज उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
अतुल भातळकरांनी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, बारमालकांकडून वसुली करणाऱ्या अनिल देशमुख यांची याचिका फेटाळून हायकोर्टाने त्यांचे कायद्यापासून पळण्याचे मार्ग बंद केलेत. देशमुखांचं उठसूठ समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही तोंड काळं झालंय. वसुलीबाजांसाठी कोठडीची दारं उघडली आहेत’, अशी टीका अतुळ भातळकरांनी केली आहे.
Previous Articleपासार्डे येथील प्राथमिक शाळेची भिंत ढासळली
Next Article कोयना धरणातून उद्या होणार इतका विसर्ग








