प्रतिनिधी / सांगली
महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोव्हीड-१९ या महामारीच्या सांगलीमधीलपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सांगलीमध्ये आले होते.
त्यावेळी त्यांना सांगली मधील कोरोना पेशंटना कोरोनाच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्यामुळे जो त्रास सहन करावा लागत आहे, त्या बाबतचे निवेदन दिले व या परिस्थितीमधून कोरोना रुग्णांच्या हाल अपेष्टा थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती भाजपचे जिल्हा प्रशिक्षण प्रमुख श्रीकांत शिंदे व मिरज तालुका दक्षता कमिटी सदस्य किरण पाटील यांनी दिले. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, महापौर गीता सुतार, नगरसेविका सविता मदने, गणेश कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Articleव्ही-चॅटवर बंदी घातल्यास चीन अॅपल कंपनीवर बहिष्कार टाकेल
Next Article ‘या’ राज्यात आता 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन








