सांगली / प्रतिनिधी :
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी सांगली मध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष पैलवान संभाजीराव पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. काही महिन्यांपूर्वीच संभाजी पवार यांचे निधन झाले आहे. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या फडणवीस व दरेकर यांनी पवार कुटुंबीयांची भेट घेऊन जुन्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांच्यासह संभाजी पवार यांचे पुत्र पृथ्वीराज पवार गौतम पवार उपस्थित होते.








