मुंबई / ऑनलाईन टीम
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना विरोधक आणि राज्य सरकार यांच्यात आरोपाची मालिका सुरूच आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी देखील जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनीा कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये, असा शब्दात त्य़ांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची परंपराच राहिलेली आहे की, ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट आले जसे की किल्लारीचा भूकंप असेल, मुंबईमध्ये झालेला २६/११ चा हल्ला किंवा रेल्वेमध्ये झालेले १६ बॉम्बस्फोट अशा अनेक प्रसंगाच्या वेळेस राजकारण बाजूला सोडून विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी हातात हात घालून कामं केले आहे. त्याकाळात मी विरोधी पक्षनेता होतो. पण अशा संकटामध्ये कुत्र्या मांजराचा खेळ आम्ही खेळलो नाही. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र सरकार अख्त्यारित जे काही आहे ते करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. रेमडेसिवीरचीकेंद्र सरकारने निर्यात केली नसती तर रेमडेसिवीरची टंचाई जाणवली नसती. आता निर्यात बंद केली असल्याने तो साठा उपलब्ध होईल. पण आतापर्यंत सरकार आपल्याकडे कमी पडतंय आणि बाहेर पुरवठा करतोय अशी स्थिती होती. त्यामुळे केंद्रानं मदत केली पाहिजे. जिथं रुग्णसंख्या जास्त आहे तिथे राजकारण बाजूला ठेवून मदत करण्याची गरज असल्याचे एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.
Previous Articleदेशात होतेय लॉकडाऊनची तयारी? केंद्रीय गृहमंत्री म्हणाले…
Next Article नैऋत्य रेल्वे विभागाकडून कोरोना जनजागृती








