सातारा / प्रतिनिधी :
वाई तालुक्यातील कोंढावळे गावानजीक असलेल्या देवरुखवाडीत गुरुवारी सायंकाळी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढल्या गेलेल्या मायलेकींचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे.
गुरुवारी सायंकाळी भूस्खलन होऊन त्या मायलेकी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढल्या गेल्या होत्या. तर इतर 21 जणांना बाहेर काढण्यात यश आले होते. आज सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेतल्यावर त्या दोघीचे मृतदेह सापडले.