वार्ताहर / देवराष्टे
देवराष्ट्रे ता.कडेगांव येथील जून्या शिरगांव ते कुंभारगांव रस्त्याकडेला जयसिंग शामराव जमदाडे (वय – 45 वर्षे) रा.देवराष्ट्रे यांचा आज गुरुवार दि.04 जून सकाळी 11 वाजणेच्या सुमारास अज्ञाताने धारधार शस्त्राने वार करुन अत्यंत क्रुर पध्दतीने खून केला आहे.
रस्त्याकडेला रक्ताचा सडा पडला असून हल्लेखोर पसार झाला आहे. देवराष्ट्रे, शिरगांव आणि कुंभारगांवच्या लोकांनी बघण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे. या घटनेने परिसरांत यासंदर्भात उलटसूलट प्रतिक्रियांसह हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांनी तात्काळ धाव घेऊन सदर परीसर ताब्यात घेऊन तपासाची चक्रे गतीमान केली आहेत.








