बसवण कुडची येथील 63 भूखंडांची करणार विक्री
प्रतिनिधी / बेळगाव
रामतीर्थनगर वसाहत आणि कुमारस्वामी लेआऊट महापालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी विकासकामे राबविण्यात येत आहेत. विकासकामे राबविण्यासाठी निधीकरिता बुडाच्या वसाहतींमधील भूखंड लिलाव करण्यात येत आहेत. योजना क्रमांक 11, देवराज अर्स कॉलनी बसवण कुडची येथील 63 भूखंडांची विक्री करण्यासाठी दि. 23 रोजी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी रामतीर्थनगर आणि सहय़ाद्रीनगर, कुमारस्वामी लेआऊट अशा विविध वसाहतांमधील भूखंडांची विक्री लिलावाद्वारे करण्यात आली आहे. बुडाच्यावतीने ठिकठिकाणी विकासकामे राबविण्यात येत आहेत. रामतीर्थनगर वसाहत महापालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी गटारींचे बांधकाम, रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. याकरिता 30 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. कुमारस्वामी लेआऊटमधील विकासकामे राबविण्यासाठी पाच कोटांची विकासकामे राबविण्यात येत आहेत. सदर विकासकामे करण्यासाठी बुडाकडे निधी नसल्याने भूखंडांची विक्री करण्यात येत आहे. यापूर्वी काही भूखंडांची विक्री करण्यात आली होती. आता पुन्हा बसवण कुडची येथील देवराज अर्स कॉलनीमधील 63 भूखंड लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहेत. या लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी 50 हजार रुपये अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. दि. 22 व 23 रोजी बोली लागणार आहे. येथील लहान-मोठय़ा आकाराच्या भूखंडांचा समावेश असून, प्रती चौ. फूट 1 हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. यापुढे जास्त बोली लावणाऱयांना भूखंड मिळू शकतो. भूखंडांची विक्री ई लिलावाद्वारे करण्यात येत आहे.









