व्होडाफोन-आयडियासह एअरटेलचा प्रवास अडचणीचा
नवी दिल्ली : रिलायन्स जिओने पुन्हा एकदा आपणच देशात दूरसंचार कंपन्यांमध्ये अव्वल स्थानी असल्याचे सिद्ध केले आहे. जिओने जवळपास 40 कोटी ग्राहकांची जोडणी करुन हा नवा टप्पा गाठलेला आहे. जुलैमध्ये कंपनीने 35.5 लाख नव्याने ग्राहक जोडणी केली आहे. परंतु कंपनीच्या ऍक्टीव्ह ग्राहकांमध्ये 8.5 कोटीपेक्षा अधिकची घसरण झालेली आहे. तसेच जुलैमध्ये दूरसंचार उद्योगालाही 35 लाख ग्राहकांचा लाभ झाला असल्याची माहिती भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडने दिली आहे.
तेजीने घटले ऍक्टिव्ह ग्राहक
जून 2020 मध्ये भारतीय दूरसंचार ग्राहकांची संख्या 32 लाखांनी कमी झालेली आहे. यामध्ये जिओकडे सध्या सर्वाधिक ग्राहकांची संख्या असली तरीही ऍक्टिव्ह ग्राहकांच्या संख्येत मोठी घट होत गेल्याचेही ट्रायने यावेळी स्पष्ट केले आहे.









