प्रतिनिधी/ फोंडा
दूध उत्पादकांना प्रतिलिटरमागे तीन रुपये याप्रमाणे दरवाढ देण्याच्या प्रलंबीत मागणीसह दरफरक व अन्य मागण्यांची त्वरीत अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाच इशारा दूध उत्पादकांनी दिला आहे. सरकारकडून सहकारी संस्थासंबंधी जे धोरण राबविले जात आहे, ते सहकार क्षेत्राला मारक आहे. त्याविरोधात दूध उत्पादक व ऊस उत्पादकांना यापुढे संघटीतपणे लढा द्यावा लागणार आहे, अशी माहिती दूध उत्पादक अनुप देसाई यांनी फोंडा येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी दूध उत्पादक संजीव कुंकळय़ेकर, वैभव परब, विश्वास सुखठणकर, प्रमोद सिद्धये व बाबू फाळे हे उपस्थित होते. गेल्या 2 मार्च रोजी दूध उत्पादकांना प्रती लिटर मागे तीन रुपये दरवाढ देण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते. चार महिने उलटूनही अद्याप दरवाढीसंबंधी अंमलबजावणी झालेली नाही. दर फरक व लांभाशाची रक्कमही शेतकऱयांना वेळेत मिळत नाही. अशा परिस्थितीत अनेक दूध उत्पादकांच्sढ बँकेतील कर्ज थकले आहे. व्यवसाय बुडवून गुरे विकण्याची परिस्थिती त्यांच्यावर आली आहे.
दूध उत्पादकांचा आधार असलेल्या गोवा डेअरीचा एकंदरीत कारभार पाहिल्यास शेतकऱयांचे प्रश्न व समस्यांबाबत त्यांना काहीही पडलेले नाही. दूध उत्पादकांच्या घामाकष्टावरच डेअरी चालते याचे भान त्यांना राहिलेले नाही. डेअरीच्या कारभारात सुधारणा करा, मार्केटिंग वाढवा या दूध उत्पादकांच्या सुचनांकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे, असेही अनुप देसाई यांनी सांगितले. सरकारकडून डेअरीवर जे प्रशासक नेमले जातात त्यांचा डेअरीबाबत सुरु असलेला अभ्यास संपेपर्यंत त्या जागी दुसरा प्रशासक नियुक्त झालेला असतो. दूध उत्पादकांचे प्रश्न मात्र कधीच सुटत नाहीत. केंद्र सरकारने शेतकऱयांसाठी मोठय़ा प्रमाणात योजना जाहीर करूनही गोव्यातील दूध उत्पादकांना त्याचा कुठलाही फायदा होत नाही, असा आरोपही त्यांनी केला.









