बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर स्वतःच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. श्रद्धा कपूर स्वतःचा आगामी चित्रपट ‘चालबाज लंडन’मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. श्रद्धाने यासंबंधी एक चित्रफितही प्रसारित केली आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर डबल रोलमध्ये दिसून येणार आहे.
1989 मध्ये प्रदर्शित ‘चालबाज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पंकज यांनी केले होते. या जुन्या चित्रपटात श्रीदेवी आणि रजनीकांत दिसून आले होते. नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन पंकज पराशर करणार आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, अहमद खान आणि शायरा खान चित्रपटाचे निर्माते असल्याची माहिती श्रद्धाने दिली आहे.









