ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोव्हिड-19 च्या बूस्टर डोसला परवानगी देण्यात आली आहे. 10 जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षाहून अधिक वयाच्या वृद्धांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बुस्टर डोस देण्यात येणार आहे. मात्र, कोरोनाचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस यामध्ये नेमके किती अंतर असावे, यावर तज्ञांकडून विचार सुरू आहे. पीटीआयने सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, कोरोना लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस यामध्ये 9 ते 12 महिन्यांचे अंतर असण्याची शक्यता आहे.
देशात वाढत असलेल्या ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 10 जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षाहून अधिक वयाच्या वृद्धांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बूस्टर डोस देण्यात येणार आहे. देशात आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 450 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंट घातक नसला तरी तो 70 पट अधिक संक्रमणकारक असल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.
दरम्यान, भारतात लसीकरण मोहीम वेगात सुरू असून, देशात आतापर्यंत 141 कोटी लसीचे डेस देण्यात आले आहेत.









