सेन्सेक्स 52.94 तर निफ्टी 11.55 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील एक दिवसाच्या तेजीनंतर दुसऱया सत्रात मंगळवारी मात्र घसरणीसह बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये दिवसभरातील कामगिरीमध्ये एचडीएफसी बँक, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज यासारख्या समभागांमध्ये घसरण झाल्याने बाजार प्रभावीत झाला आहे. दुसऱया बाजूला आशियातील शेअर बाजारातील नकारात्मक स्थितीचा परिणाम भारतीय बाजावर झाला आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 52.94 अंकांनी घसरुन निर्देशांक 52,275.57 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 11.55 अकांनी प्रभावीत होत निर्देशांक 15,740.10 वर बंद झाल्याची नोंद केली आहे.
सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांमध्ये स्टेट बँकेचे समभाग हे एक टक्क्यांपेक्षा अधिकने घसरले आहेत. यासोबत एचडीएफसी बँक, एचडीएफसी, कोटक बँक, पॉवरग्रिड कॉर्पसह आयसीआयसीआय बँकेचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, भारती एअरटेल, इन्फोसिस आणि एचसीएल टेक यांचे समभाग लाभासह बंद झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आशियातील बाजारातील चीनचा शांघाय कम्पोजिट, हाँगकाँग, जपानचा निक्की नुकसानीमध्ये राहिले आहेत. युरोपीय बाजार लाभात राहिले आहेत.
चढउताराच्या प्रवासात स्थितरता
दुसऱया दिवशीच्या सत्रात भांडवली बाजारात प्रामुख्याने निर्देशांक हा चढउतारामध्ये कामगिरी करीत बंद झाला असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये आर्थिक आणि धातू कंपन्यांच्या समभागांची विक्री दबावामध्ये झाली आहे. तसेच आयटी, एफएमसीजी आणि औषध कंपन्यांच्या समभागांचे मात्र बाजाराला समर्थन मिळाले आहे.









