प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील 1400 शिक्षकांच्या बदली कौन्सिलिंगला सोमवार पासून प्रारंभ झाला. सोमवारी व मंगळवारी अशा दोन दिवसात 500 शिक्षकांचे कौन्सिलिंग करण्यात आले. त्यापैकी 107 शिक्षकांच्या बदल्या मंगळवारी करण्यात आल्या. उर्वरित शिक्षकांचे कौन्सिलिंग बुधवारी होणार आहे.
सहशिक्षक, मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक अशा प्रकारांमध्ये शिक्षकांची कौन्सिलिंग केले जात आहे. पहिल्याच दिवशी काहीसा गोंधळ झाल्यामुळे कौन्सिलिंगची प्रक्रिया रखडली होती. खानापूर, रामदुर्ग व सौंदत्ती येथील 25 टक्के जागा रिक्त असल्यामुळे या तालुक्मयातील बदली प्रक्रिया थांबविण्यात आली. यामुळे काही शिक्षकांनी आक्षेप घेऊन कौन्सिलिंग थांबविले होते.
मंगळवारी दुसऱया दिवशी सकाळपासूनच जिल्हाभरातून शिक्षक दाखल झाले होते. कौन्सिलिंग प्रक्रियेला सुरूवात झाल्यानंतर शिक्षकांना रिक्त असलेल्या जागा दाखविण्यात येत होत्या. त्यानंतर बदलीची प्रक्रिया पूर्ण केली जात होती. दोन दिवसांमध्ये 500 हून अधिक शिक्षकांचे कौन्सिलिंग करण्यात आले. त्यापैकी 107 शिक्षकांनी इतर शाळांमध्ये बदली करून घेतली. उर्वरित 1 हजार शिक्षकांचे कौन्सिलिंग बुधवारी होणार आहे.
बदलीसाठी शिक्षकांची शहरालगत पसंती : दुर्गम भागात जाण्यास नकार
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील शिक्षकांच्या बदली कौन्सिलींगला सोमवारपासून प्रारंभ झाला. एकूण 1400 शिक्षकांचे कौन्सिलींग केले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. परंतु बेळगाव तालुका व शहरालगत भागामध्येच बदली करून घेण्यासाठी शिक्षकांची पसंती आहे. यासाठी जोरदार लॉबिंग लावली जात आहे. परंतु रामदुर्ग, सौंदत्ती व खानापूर या दुर्गम भागामध्ये बदलीसाठी शिक्षकांकडून नकार दिला जात आहे.
क्लबरोड येथील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात सोमवारपासून कौन्सिलींगला सुरूवात झाली. रिक्त असणाऱया जागांसाठी बदली प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र खानापूर, रामदुर्ग व सौंदत्ती या तालुक्मयातील 25 टक्क्मयाहून अधिक जागा रिक्त असल्याने या तालुक्मयातील शिक्षकांची बदली स्थगित करण्यात आली. यामुळे शिक्षकांनी आंदोलनही छेडले.
बेळगाव शहर व तालुक्मयात बदलीसाठी पहिली पसंती शिक्षकांकडून दिली जात आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाकडून शहर व तालुक्मयाचीच मागणी केली जात होती. आपल्याला हवे त्या ठिकाणी बदली मिळत नसल्याने अनेक शिक्षकांना निराश होऊन परतावे लागले. मंगळवारी झालेल्य कौन्सिलींगमध्ये अधिकाधिक शिक्षकांनी बेळगाव शहरात बदली करून घेण्यास पसंती दिली. बेळगाव शहरासोबतच तालुक्मयातील जवळपासच्या गावांमध्ये बदली करून घेण्यास शिक्षक इच्छुक होते. परंतु खानापूर, रामदुर्ग व सौंदत्ती यासारख्या दुर्गम भागामध्ये बदली करून घेण्यास शिक्षकांनी नापसंती दिली.