रिलायन्स, एचडीएफसी, आयसीआयसीआयचे समभाग तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील सलग दुसऱया दिवशी मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागातील तेजीच्या बळावर बीएसई सेन्सेक्सने 478 अंकांचा उच्चांक गाठल्याचे पहावयास मिळाले आहे. देशातील प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीसोबत जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे सलगच्या विदेशी कोष प्रवाहामुळे बाजाराची स्थिती मजबूत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमुळे सेन्सेक्स 477.54 अंकांनी वधारुन निर्देशांकाने 38,528.32 चा टप्पा गाठला आहे. तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 138.25 अंकांची तेजी प्राप्त करत निर्देशांक 11,385.35 वर स्थिरावल्याची नोंद करण्यात आली आहे.
दिवसभरात सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्मयांनी तेजीत राहिले आहेत. सोबत कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, एशियन पेन्ट्स आणि टाटा स्टीलचे समभाग नफ्यात राहिले आहेत. सर्वाधिक योगदानात रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश राहिला आहे. दुसरीकडे मात्र टेक महिंद्रा, एचसीएल टेक, बजाज ऑटो आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग मात्र नुकसानीत राहिले आहेत.
सेन्सेक्समधील मोठय़ा कंपन्यांच्या समभगांच्या लिलावामुळे व विदेशी कोषातील सलगच्या प्रवाहामुळे बाजाराला मजबूत स्थिती प्राप्त करता आली आहे. शेअर बाजाराच्या अस्थायी आकडय़ानुसार विदेशी संस्थांकडून गुंतवणूकदारांनी सोमवारी निव्वळ स्वरुपात 332.90 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे. जागतिक वातावरणाचा फायदा हा स्थानिक बाजाराला झाला आहे. अन्य बाजारात आशियाई बाजारातील चीनचा शांघाय कम्पोजिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे लाभात राहिले असून जपानचा व दक्षिण कोरियाचा बाजार घसरणीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.









