प्रतिनिधी/ म्हसवड
तासगांव तालुक्यातील तुरची येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य व वरिष्ठ पोलिस निरिक्षक संभाजी सुदाम सावंत यांना नुकताच 26 जानेवारी 2020 रोजी उल्लेखनीय कामगिरी बद्दल कायम दुष्काळी असलेल्या माण तालुक्याचा पुन्हा ऐकदा गौरव केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपती पोलिस पदक जाहिर केल्याबद्दल त्याची मायभुमि असलेल्या देवापुर येथे उद्या शनिवारी 1 फेब्रुवारी 2020 रोजी नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे
पोलिस निरिक्षक व पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य असलेले संभाजी सुदाम सावंत हे मुळचे सातारा जिह्यातील कायम दुष्काळी शिक्का कपाळी असलेल्या माण तालुक्यातील देवापुर येथील राहणारे असुन दुष्काळाचे चटके सोसत शिक्षण घेऊन 1989 पासुन पोलिस सेवेत रुजू झालेत्यांनीआत्ता पर्यत जळगाव,धुळे,नंदुरबार,मालेगांव ,नाशिक, मुंबई, सिंधूदुर्ग येथे काम केले दौंड येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून काम केले 15 में 2017 पासुन तासगांव तालुक्यातील तुरची या ठिकाणी पोलिसांना प्रशिक्षण देण्याचे प्राचार्य म्हणून काम पहात आहेत त्यांनी यापूर्वी राज्य गुप्तवार्त विभाग, नागरी संरक्षण या विभागात काम केले असुन त्यांनी जेथे काम केले तेरे उल्लेखनीय व ठसाउमटवणारे काम केल्या बद्दल त्यांना आत्ता पर्यत पोलिस खात्याअंतर्गत 300 पारितोषिक मिळाले असुन 2020 चा सर्वेउच्च असे राष्टपती पोलिस पदक जाहिर झाल्या बद्दल राज्यातील अनेक पोलिस अधिकारी वर्गानी त्याचे अभिनंदन केले असुन या शौर्या बद्दल संभाजी सावंत यांचा नागरी सत्कार देवापूर ग्रामपंचायत,, शेती सोसायटी, शेती विकास सोसायटी, व ग्रामस्थ यांच्या वतीने शनिवार दि. 1/02/2020 रोजी सायकाळी 5 वाजता देवापूर येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती देवापुर ग्रामस्थाच्या वतीने सांगण्यात आली आहे.








