दोडामार्ग / वार्ताहर:
कळणे येथील मायनींग मधील पाण्याचा बांध फुटण्याची दुर्घटना होऊन २ महिने होत आले तरी नुकसानग्रस्त कळणेवासीयांना अद्यापपर्यंत शासनाकडून कोणतीही मदत देण्यात आलेली नाही. याबाबत कळणे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत येत्या 8 ऑक्टोबर रोजी धडक आंदोलन जाहीर केले आहे. सावंतवाडीतील प्रांताधिकारी कार्यालयावर हे कळणेवासीय धडकणार आहेत.
स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी केवळ आश्वासने देण्याचे काम केले तर स्थानिक प्रशासनाने थेट राज्य शासनाकडे बोट दाखविले. या घटनेत घरांची झालेली हानी तसेच माती मिश्रीत पाणी घुसून झालेली शेती बागायतीची नुकसानी यांचे पंचनामे करून मदतीचा आकडा शासनाकडे पाठविला आहे मात्र राज्य शासनाकडून नुकसानग्रस्त कळणेवासीयांना अद्यापपर्यंत एक छदाम रुपया देखील मदत दिलेली नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी कळणेवासीय आता प्रांताधिकाऱ्यांचा दरवाजा ठोठावणार आहेत. प्रशासनाने, राज्य सरकारने आमच्या भावनांचा विचार न करता अद्याप नुकसान भरापाई बाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. ह्यासाठी आता जाब विचारणे गरजेचे आहे असे कळणे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. आज कळणे मधील अभय पांडुरंग देसाई, अरुण देसाई आणि इतर नुकसानग्रस्त शेतकरी यांनी दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांची भेट घेऊन या संदर्भात त्यांना निवेदन दिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









