उदगाव / वार्ताहर
उदगाव,चिंचवाड ता. शिरोळ सह परिसरात गेल्या दोन महिन्यापासून डेंग्यू, चिकूनगुणिया चे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाले होते.यावर उपाय म्हणून जिल्हास्तरीय आरोग्य पथक यांनी या भागात भेट देऊन पाहणी करत नागरिकांना सूचना देत उपाययोजना कशी करता येईल यावर भर दिला.
यावर उपाययोजना करण्याकरिता जिल्हास्तरीय आरोग्य पथक पाठविण्याची विनंती प्रशासन, व लोकप्रतिनिधींनी केली होती.सहायक जिल्हा हिवताप अधिकारी एम. जी वड्ड यांचे नेतृत्वाखाली 9 सदस्यीय पथक दाखल झाले.
उदगांव, चिंचवाड, अर्जुनवाडसह परीसरात डेंग्यू व चिकुनगुनियांने थैमान घातलेे आहे. उदगांव येथे साखळे मळा, संत रोहीदासनगर, नंदीवाले वहसात, गावभाग याठिकाणी डेंग्यूचे 17 हुन अधिक रुग्ण सापडले आहेत. तर चिकुनगुनियांचे 300 हुन अधिक रुग्ण आहेत. ह्या पथकाने उदगाव येथील धनगर गल्ली, महादेवी चौक,मादनाईक गल्ली येथील 300 घरांचे सर्वेक्षण केला असता तब्बल 43 ठिकाणी चिकूनगुणिया सदृश अळ्या सापडून आल्या.तीन ठिकाणचे रक्तजल नमुने पुढील तपासणीसाठी कोल्हापूर येथे पाठवले आहेत.
या पथकात नंदकुमार मोहिते,आर डी कुरणे,अमृत सुतार,विजय शिंदे, वेदांते यांचे सह प्राथमिक आरोग्य जयसिंगपूर चे आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग खटावकर व कर्मचारी त्यांचा समावेश होता.