प्रतिनिधी/कास
कास पठार वन समितीचे कार्यतत्पर कर्मचारी नेहमीप्रमाणे कुमुदीनी तळ्याशेजारी असणाऱ्या कुत्रीम पाणवठयात पाणी टाकण्यासाठी गेले असता त्यांना दुर्मीळ कासव आढळुन आले त्यांनी तात्काळ कुमुदीनी तळ्यातील पाणी पूर्णपणे अटल्याने कासव पाण्याच्या शोधात बाहेर आल्याचे लक्षात घेऊन कासवाला ताब्यात घेतले व त्याला कास तलावात सोडून जिवदान दिले आहे.
शुक्रवारी दुपारी १२ वाजता कास वनसमीतीचे कर्मचारी नेहमी प्रमाणे कृत्रिम पाणवठयांमध्ये पाणी टाकत टाकत कुमुदीनी तळयाशेजारी असणाऱ्या कुत्रीम पाणवठयावर गेले असता त्यांना तेथे पाण्यात राहणारे दुर्मिळ कासव माळरानावर आढळून आले. कुमुदीनी तळ्यातील पाणी पूर्णपणे आटले असून कासव पाण्याच्या शोधात बाहेर पडल्याचे नकर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी कासवाला सुरक्षितरित्या समितीच्या वाहनात घेऊन वेळ न दवडता कास तलावमध्ये सोडून जिवदान दिले या मोहिमेमध्ये प्रदीप शिंदे, अभिषेक शेलार, विजय बादापूरे, आनंद शिंदे, निलेश कदम, संदीप साळुंखे, सिताराम बादापूरे, ,नारायण मोरे, बजरंग गोरे आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला नेहमी निसर्ग जतनासह व वन्यप्राणी रक्षणासाठी कार्यतत्पर राहणाऱ्या या वन समितीच्या कर्मचाऱ्यांचे पर्यवरण प्रेमीतुम कौतुक होत आहे.









