प्रा.दत्ता नाईक यांचे उद्गार
पर्वरी / प्रतिनिधी
दुर्दम्य इच्छाशक्ती,आत्मविश्वास तसेच सकारात्मकता या त्रिसूत्रीवर विद्यार्थी आत्मनिर्भर होऊ शकतो असे उद्गार प्रा.दत्ता नाईक यांनी काढले.विद्या प्रबोधिनी ऊच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक बक्षिस वितरणात ते बोलता होते.याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष स्थानी श्री.संजय वालावलकर, विद्याप्रबोधिनी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य.दामोदर म्हार्दोळकर,कार्यक्रम प्रमूख श्री.विलास पालकर ,पालक शिक्षक संघाचे सचिव श्री.महेश नागवेकर,पालक शिक्षक संघाची कोषाध्यक्ष सौ.प्रगती पेडणेकर,सदस्य दत्ताराम नाईक व्यासपीठावर उपस्थित होते.
तुलात्मक दृष्टय़ा कला क्षेत्रात गुणात्मक यश संपादन करणे हे अत्यंत दुर्मिळ गोष्ट असून यावषी मराठी आणि मानसशास्त्र या विषयात उर्विजा नागवेकर हिने शालांत मंडळात प्रथम क्रमांक संपादित करून उच्चा?क केलेला असून अनुष्का गायतोंडे हिने अर्थशास्त्र या विषयात 99 गुण संपादन करून शालांत मंडळात विक्रम केलेला आहे.या प्रसंगी विज्ञान शाखेत प्रथम आलेल्या सिद्धार्थ फडते,वाणिज्य शाखेत प्रथम आलेल्या अनुष्का गायतोंडे आणि शाळेत सर्वप्रथम आलेल्या उर्विजा नागवेकर यांचा या प्रसंगी स्मृतीचींह ,रोख व प्रशस्ती पत्र देवून सन्मान करण्यात आला तसेच गेल्या अकारवीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या दीक्षिता वेळीप,??शी वेर्णेकर आणि सिद्धेश्वर पेडणेकर यांचाही सन्मान करण्यात आला.
कोणत्याही प्रसंगात अचूक निर्णय घेण्याची क्षमता या वयात विकसित होण्याची गरज असून बाह्य प्रलोभनाला न भूलता स्पर्धात्मक युगाचे आव्हाने स्वीकारावे असे आवाहन श्री.संजय वालावलकर यानी केले.कोणतीही गोष्ट साध्य करण्यात पालक शिक्षक यांचा महत्वाचा भाग असतो तो काही वेळा दिसत नसला तरी महत्वाचा असतो.
सुरुवातीला पालक शिक्षक संघाचे सचिव महेश नागवेकार यांनी स्वागत आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला तर शेफाली नार्वेकर,लक्ष्मीकांत गवस,शुभांगी अग्नी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा परिचय करून दिला.प्राचार्य दामोदर म्हार्दोळकर यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले .या प्रसंगी शिक्षकांनी विविध विषयात पुरुस्कृत केलेल्या स्मरणार्थ पारितोषिकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी कण्यासाठी कार्यरत असलेल्या समितीमध्ये संजय सावैकर,विलास पालकर,प्रशांत वेळीप,सायली बांदोडकर,नरेंद्र जोशी,रीमा नाईक,तन्वी मयेकर,दीपिका नाईक,मेघना देवारी,भास्कर साळगावकर,चंदेश फडते,सुनील मेतर ,प्रशांत नाईक,ईश्वर नौशेकर,अंकुश ओझरकर यांनी सहकार्य केले.श्री.संदेश नाईक यांनी आभार मानले तर सौ.मेघना देवारी यांनी शांतीमंत्र सादर केला.









