प्रतिनिधी/ बेळगाव
हेस्कॉमच्या वतीने दुरूस्तीचे काम रविवार दि. 10 रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे हिंडलगा पंपिंग हाऊसचा विद्युतपुरवठा बंद राहणार असल्याने 600 अश्वशक्तीचे विद्युत पंप बंद ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे 24 तास पाणीपुरवठा योजनेसह संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस ठप्प राहणार आहे.
दुरूस्तीचे काम निघाल्याने दि. 10 रोजी सकाळी 9 पासुन 5 पर्यंत विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. पंपिंग स्टेशनमधून जलशुद्धीकरण केंद्राला करण्यात येणारा पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे दि. 10 आणि 11 रोजी पाणी पुरवठय़ात व्यत्यय निर्माण होणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.









