डिझेल काढण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मिऱया येथे गेले सव्वा महिना अडकून पडलेले एमटी बसरा स्टार जहाज वारंवार दगडांवर आपटून त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे जहाजात पाणी भरत असल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आह़े सध्या हे जहाज तरंगण्याऐवजी बुडण्याचाच धोका आह़े जहाज किनाऱयावर दुरुस्त केल्यानंतरच समुद्रात ओढण्यात येणार असल्याचे प्रादेशिक बंदर अधिकारी पॅ. संजय उगलमुगले यांनी सांगितल़े
जहाजामधील सुमारे 7 हजार लिटर ऑईल काढल्यानंतर लागोलग जहाजामधील 25 हजार लिटर डिझेल काढण्याची कार्यवाही सुरु करण्यात आल़ी मात्र हे डिझेल काढताना मुसळधार पाऊस, अजस्त्र लाटा व वेगवान वाऱयांमुळे तांत्रिक पथकाला अपयश येत होत़े सध्यस्थितीत जहाजामधील डिझेल काढण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे पॅप्टन उगलमुगले यांनी सांगितल़े
डिझेल काढल्यानंतरच किनाऱयालगत हे जहाज दुरुस्त करण्यात येणार आह़े सध्यस्थितीत बसरा स्टार जहाज चेपून, फाटून दयनीय अवस्था झाली. तसेच जहाजाच्या मागील बाजूस असणारा इंजिनचा भाग वाळूमध्ये घोरल्याचे दिसून येत आह़े उधाणाच्या लाटांमुळे जहाजामध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी घुसले आह़े परंतु ते आहे त्या स्थितीत दुरुस्त करणे शक्य नसल्याने बाहेर काढून दुरुस्तीनंतरच समुद्रामध्ये ओढण्यात येईल, असे उगलमुगले यांनी सांगितले. मात्र यासाठी काही कालावधी लागणार असल्याने जहाजाचा मुक्काम अनिश्चित काळासाठी वाढण्याची शक्यता आह़े वेगवान वारे, अजस्त्र लाटा व मुसळधार पावसामुळे जहाज दुरुस्त होण्यासाठी किती कालावधी लागेल, या बाबत साशंकता व्यक्त केली जात आह़े नारळी पौर्णिमेनंतरच समुद्र शांत होण्याची शक्यता आह़े त्यामुळे जहाज दुरुस्त होवून समुद्रामध्ये जाण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडण्याची शक्यता असल्याचे स्थानिक ग्रामस्थ व मच्छीमारांनी सांगितल़े
दुरुस्तीनंतरच बाहेर काढणार
पर्यावरणाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने जहाजामधील डिझेल काढण्यात यश आले आह़े डिझेल काढण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आह़े अपघातग्रस्त जहाजाची दुरुस्ती झाल्यावरच हे जहाज बाहेर काढले जाणार आह़े
-पॅ. संजय उगलमुगले, प्रादेशिक बंदर अधिकारी









