वृत्तसंस्था/ दुबई
एटीपी टूरवरील येथे 21 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱया 500 दर्जाच्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत ब्रिटनचा माजी टॉप सीडेड अँडी मरेला स्पर्धा आयोजकांनी वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश दिला आहे. मरेने वाईल्ड कार्डचा स्वीकार केला आहे.
अँडी मरेने 2017 साली ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्याचे दुबईत यावेळी पहिल्यांदाच पुनरागमन होत आहे. आतापर्यंत या स्पर्धेत मरेने सातवेळा आपला सहभाग दर्शविला आहे. ही स्पर्धा हार्ड कोर्टवर खेळविली जाणार असून या स्पर्धेत विद्यमान विजेता कॅरेटसेव्ह, सर्बियाचा टॉप सीडेड जोकोविच तसेच रशियाचा रूबलेव्ह, कॅनडाचा ऍलीसिमे आणि सिनेर हे सहभागी होत आहेत.









