दुधात कॅल्शियम, प्रोटीनसह अनेक न्यूट्रिएंटस आढळून येतात. हे न्यूट्रिएंटस शरिराला पोषण देण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच प्रत्येक वयोगटातील लोकांना दूधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु काही घटकांबरोबर दुधाचे सेवन केल्यास हे अधिक फायदेशीर ठरू शकते.
- हळदः दुधात हळदीचे मिश्रण करून त्याचे प्राशन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. सर्दी, पडसे झाल्यास दूधाचे सेवन फायदेशीर ठरते. यामुळे सांधेदुखीही कमी होते.
- केशर : दूध आणि केशरचे मिश्रण यात भरपूर पोटॅशियम असते. यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत मिळते. केशरच्या सेवनाने मूड चांगला राहतो. उच्च रक्तदाबाच्या रुग्णाला आणि तणावाचा सामना करणार्या लोकांना डॉक्टर केशर सेवानाचा सल्ला देतात. गर्भवतींसाठी देखील केशरचे दूध पिणे लाभदायी ठरते.
- डार्क चॉकलेट: दूधात चॉकलेटच्या कॉम्बिनेशनपासून शरिराला कॅल्शियमबरोबरच फ्लेवोनॉइडस मिळतात. त्याच्या सेवनातून आर्थरायटिस आणि कॅन्सरसारखे आजारांना फायदा मिळतो. हे त्वचेला मुलायम आणि चमकदार बनवतो.
- बदाम : दूधात बदामाच्या भूकटीचे मिश्रण करा.त्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. यातील आयरन आणि कॅल्शियम हे रक्त वाढवण्याचे काम करते.
- केळी : दूध आणि केळीचा शेक हे अनेकांचे आवडते पेय. त्याचे प्राशन केल्याने कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे मिश्रण शरिराला ऊर्जा देण्याबरोबरच हृदय आणि रक्तदाबाविषयीच्या तक्रारीपासून बचाव करतात. यात व्हिटॅमिन बी-12 आढळून येते. यामुळे डिप्रेशन नियंत्रित राहते.
- मधः दूधात कॅल्शियम आणि मधात असलेले कार्बोहायड्रेट हे शरिरातील मेटाबॉलिज्मची पातळी वाढवण्याचे काम करतात. स्नायू मजबूत होतात. हे कॉम्बिनेशन अँटीएजिंगचे काम करते. यातील अँटीऑक्सिडेंटस शरिरासाठी फायद्याचे आहे.
- खजूरः दूधाबरोबरच खजूर खाण्याची परंपरा खूप जूनी आहे. यात विपूल प्रमाणात पौष्टिक तत्त्व आढळतात. हे फायबरयुक्त खाद्य आहे. यात आयरनचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे शरिराला ऊर्जा मिळते आणि रक्ताची कमतरता दूर करते.









