प्रतिनिधी / शिरोळ
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दूध दरवाढ व अन्य मागण्यासाठी दूध बंद आंदोलन इषारा दिला होता. शिरटी ता. शिरोळ येथील युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दुध संकलन केंद्र बंद करण्यात आले. जमा झालेल्या दुधापासून बासुंदी तयार करून आई वृद्धाश्रमातील वृद्धांना वाटप करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दि 21 रोजी दूध बंद आंदोलन पुकारले. या आंदोलनात तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला शिरटी ता. शिरोळ येथील युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरपंच प्रकाश, उदगावे माजी सरपंच राहुल सूर्यवंशी, संतोष पाटील यांच्यासह अन्य त्यांनी कार्यकर्त्यांनी जमा झालेल्या दुधापासून बासुंदी तयार केली. ती बासुंदी पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे यांच्याकडे सुपूर्त करून चिपरी येथील आई वृद्धाश्रमातील वृद्धांना वाटप करण्यात आले स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ती तोडफोड न करता शांततेने आंदोलन करण्यात आले. यावेळी रावसाहेब पाटील मलिकवाडे प्रदीप चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.








