6 गुन्हे उघडकीस ः 1 लाख 9 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी/ सातारा
sशाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने जबरी चोरीचे व बॅटरी चोरीचे फरार गुह्यातील आरोपीस जेरबंद करून त्याच्या साथीदारांकडून मोटार सायकल चोरी व बॅटरी चोरीचे 6 गुन्हे उघडकीस आणून 1 लाख 9 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या चोरीतील आरोपी अभिषेक मार्तंड कुचेकर (वय 19, रा. करंजे), अक्षय रंगनाथ लोखंडे (वय 21, रा. सैदापुर), विपुल तानाजी नलवडे (वय 21, रा. पिलेश्वरीनगर कंरजे) अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रेकॉडवरील मोटार सायकल चोरी करणारा अभिषेक मार्तंड कुचेकर काळय़ा रंगाच्या स्प्लेंडर मोटार सायकल (क्रं. एमएच 11 एआर 8386) घेऊन वेगात करंजेनाका बाजुकडे जात असताना दिसला. यावेळी ठाणे अंमलदार यांना मोटार सायकल चोरीची असल्याचा संशय आल्याने त्यांनी अभिषेक याचा पाठलाग करून त्याला करंजेनाका येथे थांबवून ताब्यात घेतले. आणि त्याच्याकडे मोटार सायकलची विचारपुस केली. ही मोटार सायकल एसटी स्टॅड जवळील कॉँग्रेस भवनच्या शेजारुन मज्जीद जवळून चोरुन आणल्याची कबुली दिली. तसेच शाहूपुरी, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देऊन या शिरवळ व पुणे येथे ठेवल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत.
अभिषेक याला न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडीत रिमांड घेऊन आणखी चौकशी केली असता त्याने सध्या जेलमध्ये असलेले साथीदार अक्षय रंगनाथ लोखंडे व विपुल तानाजी नलवडे यांच्या साथीने मोटार सायकल व 1 बॅटरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. 7 रोजी पर्यंत पोलीस कस्टडीत रिमांड मंजुर केली आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे प्रकटीकरण उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस हेड कॉन्स्टेबल लैलेश फडतरे, पोलीस नाईक अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पोलीस कॉन्टेबल सचिन पवार, स्वप्निल सावंत, महिला पोलीस नाईक शोभा वरे यांनी घेतला.
6 गुन्हे उघडकीस ः 1 लाख 9 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त








