प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील पावस-देवधे मार्गावरील चांदोर फाटा येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एकजण ठार झाल़ा तर अन्य एक गंभीर जखमी झाल़ा ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडल़ी सचिन रामचंद्र गुरव (21, ऱा गवाणे लांजा) असे अपघातातील मृताचे नाव आह़े
या अपघातात रूपेश पांडुरंग गुरव (28, ऱा गवाणे लांजा) हा गंभीर जखमी झाला आह़े त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश व सचिन हे शुक्रवारी सायंकाळी दुचाकीवरून (एमएच 08 पी 1339) पावस ते देवधे असे जात होत़े दरम्यान चांदोर फाटा येथे दुचाकी घसरून अपघात झाल़ा यामध्ये सचिन हा मृत झाला तर रूपेश हा गंभीर जखमी झाल़ा या घटेनेची खबर अल्पेश अनंत गुरव (36) याने पूर्णगड पोलीस ठाण्यात दिल़ी









