बंधाऱयावर धडकली दुचाकी : एक नदीपात्रात, तर एक पिलरला अडकली
कणकवली गडनदी बंधाऱयावर अपघात
नागरिकांनी तात्काळ धाव घेतल्याने अनर्थ टळला
कणकवली:
येथील कणकवली-वागदे जोडणाऱया केटी बंधाऱयावरून दुचाकीस्वार दुचाकीसह नदीपात्रात कोसळल्याची काही दिवसांपूर्वीची घटना ताजी असतानाच शुक्रवारीही असाच प्रकार तेथे घडला. मात्र, यावेळी चक्क दोन दुचाकीस्वार युवती बंधाऱयावरून थेट खाली कोसळल्या. यात एक युवती थेट नदीपात्रात कोसळली, तर दुसरी युवती बंधाऱयाच्या पिलरवर अडकून अक्षरश: लेंबकळत होती. सुदैवाने आजूबाजूस असलेल्या नागरिकांनी धाव घेत त्यांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. मात्र, या घटनेने केटी बंधाऱयावरील वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दोन्ही दुचाकीस्वार युवती या अरुंद केटी बंधाऱयावर नेमक्या समोरासमोर आल्या. परिणामी दुचाकींची परस्परांना धडक बसली. त्यात दुचाकी बंधाऱयावरच राहिल्या तरी, दोन्ही युवती दुचाकींवरून फेकल्या जात एकाच बाजूला बंधाऱयावरून कोसळल्या. यातील एक युवती थेट नदीपात्रात कोसळली. सुदैवाने सध्या नदीपात्रात पाणी कमी असल्याने ती वाहून जाता-जाता वाचली. तर दुसरी युवती बंधाऱयाच्या पिलरवर पडून अक्षरश: लोंबकळत होती.
दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच नजीकच असलेल्या नागरिकांनी तेथे धाव घेतली. यावेळी बाळू पारकर, दामू सावंत, बंटी मेस्त्राr यांनी त्यांना तातडीने पात्रातून बाहेर काढले. यावेळी महेश गुरव, लक्षण घाडीगावकर, राजन परब, चेतन मुंज, अण्णा कोदे, उत्तम राणे, सापळे, सहदेव सावंत, ओसरगाव सरपंच तसेच इतरांनीही घटनास्थळी धाव घेतली. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह पलिकडे जातो, त्याच ठिकाणी एक युवती कोसळली होती. तर पिलरवर पडलेली अन्य युवती ही देखील नदीपात्रात कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी चपळाईने हालचाली केल्या. यात काही नागरिक नदीपात्र गाठत युवतीपर्यंत पोहोचले. सुदैवाने नदीत सध्या पाणी कमी असल्याने, त्यामुळे ती वाहून न गेल्याने मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी तिला घेत तीर गाठला. तोपर्यंत पिलरवर अडकलेल्या युवतीलाही नागरिकांनी हात देत बंधाऱयावर घेतले.
घटना घडल्याचे समजताच बंधारा परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. नदीपात्रात कोसळलेल्या युवतीला काहीशी दुखापतही झाली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर युवतींच्या पालकांनीही तेथे धाव घेतली. अपघातात दुचाकींचेही नुकसान झाले. घटनेची सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांत नोंद नव्हती.
वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर
वास्तविक, वागदे आणि कणकवली अशा दोन गावांना जोडणारा हा बंधारा नागरिकांचाही वेळ वाचविणारा आहे. पण, नियमानुसार या बंधाऱयावरून अवजड वाहनांना बंदी आहे. काही दिवसांपूर्वीच भरलेल्या नदीपात्रात दुचाकीस्वार युवक दुचाकीसह कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने तो बचावला होता. तर त्याची वाहून गेलेली दुचाकी काही दिवसांनी सापडली होती. यावेळीही नदीपात्रात पाणी कमी असल्याने मोठा अनर्थ घडता-घडता टळला. पण, या दोन्ही घटनांच्या निमित्ताने कठडाही नसलेल्या या केटी बंधाऱयावरून होणाऱया वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. st/navbharat-gold-originals/fanishwar-nath-renus-story-teesri-kasam/podcast/78368812.cms”:{“domCompleteDuration”:31.86,”ti









