प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील आरोग्य मंदीर ते साळवी स्टॉप रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी झाल़ा ही घटना सोमवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडल़ी मधुकर नारायण भावे (71, ऱा शिवाजीनगर रत्नागिरी) असे अपघातात जखमी झालेल्या पादचाऱयाचे नाव आह़े याप्रकरणी दुचाकीस्वाराविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
सिद्धेश सावंत देसाई (ऱा खेडशी रत्नागिरी) असे दुचाकीस्वाराचे नाव आह़े पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मधुकर भावे हे सोमवारी सकाळी रस्ता ओलांडत होत़े यावेळी सिद्धेश सावंतदेसाई याने आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच 08 एल 4599) ने मधुकर यांना ठोकर दिल़ी या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आह़े पुढील तपास करण्यात येत आह़े









