जीएसटीत कपातीची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुचाकी वाहनांमध्ये बाईक, स्कूटर, स्कूटी आदी वाहनांच्या किंमतीत जवळपास 10 हजार रुपयापर्यंत कपात होण्याची शक्मयता आहे. केंद्र सरकारने जीएसटी दर 28 टक्क्मयांवरुन घट करत 18 टक्के करण्याचे संकेत दिले आहेत. केंद्र सरकार दुचाकीवरील जीएसटी दर कमी करण्यावर विचार करत असल्याचे बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सांगितले आहे.
वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) परिषदेत दुचाकी वाहनांवरील करावर विशेष लक्ष दिले जाण्याचा अंदाज असल्याचे वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी म्हटले आहे. यावेळी त्यांनी वाहन उद्योगाला जीएसटी दरात सवलत देण्यावर विचार करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
जीएसटीत घट करण्याची सूचना ही वास्तवात चांगली आहे. यामुळे सदरचा मुद्दा जीएसटी परिषदेत उचलून धरला जाणार असल्याचे म्हटले आहे.
सणासुदीमध्ये विक्रीत तेजी शकय
कोरोना विषाणूमुळे आणि लॉकडाऊनमुळे वाहन क्षेत्रातील प्रवास मंदगतीने राहिलेला आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरु असून या सणात अनेकजण वाहन खरेदीस इच्छुक असतात. तेव्हा जीएसटी कमी केल्यास त्यांना याचा लाभ उठवता येईल.









