वृत्तसंस्था/ पल्लेकेले
यजमान लंका आणि बांगलादेश यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात शुक्रवारी क्षेत्ररक्षण करताना लंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे आता तो आता उर्वरित सामन्यासह मालिकेतही खेळू शकणार नाही.
कुमाराने बांगलादेशच्या पहिल्या डावात 28 षटकांची गोलंदाजी करत 1 बळी मिळविला होता. ही पहिली कसोटी आता अनिर्णित अवस्थेकडे झुकली आहे.









