कपडय़ांचे सजावटीचे दुकानदार चिंतेत
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील बाजारपेठा तसेच दुकाने खुली झाली असली तरी ग्राहक कोरोनाच्या भितीमुळे दुकानावर खरेदी करताना दिसत नाही. सध्या बाजार मार्केटमध्ये फक्त किराणा तसेच जीवानाआवश्यक वस्तूच्या दुकानावर ग्राहक दिसत आहे. अन्य दुकानदारांनी आपली दुकाने खुली केली असली तरी ग्राहक अजून खरेदीसाठी जात नाही.
कोरोनाच्या भितीमुळे संपुर्ण जग भितीच्या सावटाखाली असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपुर्ण व्यवहार ठप्प झाला आहे. अनेक दुकानदारांना फटका बसला आहे. सरकारने दुकाने खुली करण्यासा सांगितली असली तरी या दुकानावर ग्राहकच नाही. कापडय़ांची दुकाने, गिफ्ट सेटर, फर्नीचर इलॅक्ट्रोनीक अशा दुका न दुकानावर अजून ग्राहक मिळत नाही. सध्या सर्व कामे व्यवहार ठप्प असल्याने अशा दुकानांवर ग्राहक मिळत नाही.
कपडय़ांच्या दुकानदारांना फटका

हा काळ सध्या लग्नसमारंभचा होता या काळात मोठय़ा प्रमाणात नवीन कपडय़ाची खरेदी होत असते. पण यंदा कोरोनामुळे कपडय़ांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. राज्यात अनेक बाजारपेटय़ामध्ये हजारो कपडय़ाची दुकाने आहे पण सध्या gकुठलाच कार्यक्रम समारंभ नसल्याने लोक कपडय़ाच्या दुकानावर खरेदी करत नाही. पणजी सारख्या शहरात मोठय़ा प्रमाणात कपडय़ांची दालने आहे पण त्यांना ग्राहक मिळत नाही. आम्ही दिवसभर दुकानावर बसतो. पण ग्राहक येत नसल्यची खंत एका कपडे विक्रत्यांने सांगितले.
त्याच प्रमाणे अन्य विविध दुकाने सरकारने आदेश दिल्याने खुली करण्यात आली आहे. पण त्या दुकानदारांना ग्राहक नाही त्यामुळे दिवसभर बसून काहीच फायदा होत नाही. जीवन पूर्णपदावर येण्यास अजून काही वेळ जाणार आहे. सध्या फक्त जीवनाआवश्यक वस्तूची खरेदी केली जात आहे. लोकही सावधगिरी बाळगत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होईपर्यत आम्हाला काही काळा सोसावा लागणार आहे.









