प्रतिनिधी/ सातारा
शहरातील मुख्य बाजरपेठांमध्ये दुकानांच्या बाहेर अनेकवेळा गर्दी पहावयास मिळत असते. मागील वर्षी लॉकडाऊन नंतर प्रशासनाच्या सुचनेवरून दुकानांच्या बाहेर ठरावीक अंतरावर चौकोन आखुन ग्राहकांना सुरक्षित अंतरावर ऊभे केले जात होते, त्यामुळे कोरोना प्रसाराचा धोका कमी होत होता. परंतु अलीकडे काही महीन्यांपासुन दुकानदार तसेच ग्राहकांना देखील या चौकोनांचा विसर पडलेला दिसुन येत आहे. कोरोना रोगाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी दुकानांबाहेर सुरक्षा चौकोनांची पुन्हा काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.









