प्रतिनिधी /पणजी
उद्योग व्यवसाय आणि जीवन शैलीला उत्तेजन देणाऱया ‘दी स्कायलाईन’ या नियतकालीकेचे प्रकाशन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. उद्योग क्षेत्रात गोव्याचे नाव जगाच्या नकाशावर चकविण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमांची असून नकारात्मकता टाळण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
उद्योगात भरारी मारलेल्या तरुणांच्या यशोगाथा मॅगझिनमध्ये प्रकाशित होतील अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सर्वस्तरावर झाले पाहिजे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही उद्योगपतींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात पल्लवी साळगांवकर, अतुल पै काणे, कृष्णा देवाते, मंगेश आमले, प्रमोद शर्मा, धिरज जोशी, संदीप माळी, बलजींदर सिंग गील, मनोज कुमार, मनीष लुहान, विजय थॉमस, श्रृती चतुर्वेदी, विठ्ठल पारकर, निलिशा फेर्रांव, वरुण हेदे, केदार बोरकर, रुतुजा घवी, कशिश कुमार, सुशिल कुमार द्विवेदी, गौरव साळगांवकर, यश चौधरी, मंगेश आंबले, डॉ. रजनीकांत नकूल दलाल, गौरव पोकळे आदींचा सन्मान करण्यात आला.
या मॅगझिनचे व ग्लोबल नॉलेज रिसर्च फाऊंडेशन या संस्थेचे संचालक अमित जोशी यांनी प्रस्तावना केली. नितीन कुंकळ्य़ेकर व राल्फ डिसोझा यांनी मार्गदर्शन केले. भारत पटेल यांनी आभार मानले.









